Posts

५ नोव्हेंबर १८१७ - खडकीची लढाई !

Image
  ५ नोव्हेंबर १८१७ - खडकीची लढाई !   छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा साम्राज्याच्या    अंताची सुरुवात    ज्या लढाईत झाली   ती लढाई म्हणजे खडकीची लढाई होय . दि . ५ नोव्हेंबर   २०१८ रोजी   या लढाईला   २०१   वर्षे पूर्ण होतील . ही लढाई पुण्याजवळ खडकी येथे   पेशवे बाजीराव रघुनाथ भट आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यामध्ये झाली . वस्तूतः   १७६१ साली   पानिपतावर जसे तुमुल युद्ध होऊन जशी   दोन्ही पक्षांची   प्रचंड प्राणहानी   झाली त्या मानाने   या खडकीच्या लढाईत झालेली प्राणहानी   अतिशय   नगण्य म्हणावी लागेल . पण तिकडे पानिपतावर झालेल्या    प्रचंड हानी नंतर सुद्धा मराठा साम्राज्य नेटाने उभे   राहते आणि इकडे मात्र    खडकी ( आणि   मग येरवडा , कोरेगाव भीमा   आणि शेवटी आष्टी येथे )  मराठ्यांचा   निर्णायक लष्करी   पराभव न होताच मराठे शाही कशी बुडते हे वरकरणी समजून घेण्यास अवघड वाटते . यासाठी आपल्याला १८१७च्या आधी काही दशके मागे इतिहासात डोकवावे लागेल .     मराठे इंग्रज संबंध :-